¡Sorpréndeme!

Jalgaon | तोंडसुख घेणाऱ्या गुलाबराव पाटलांच्या मतदारसंघातील अस्वच्छ रस्ते पाहाच

2021-12-19 37 Dailymotion

शिवसेना नेते आणि ठाकरे सरकारमधील गुलाबराव पाटील यांनी रस्त्यांची तुलना अभिनेत्री हेमा मालिनीच्या गालाशी केली. गुलाबरावांच्या वक्तव्यानंतर आता राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी बोदवड नगरपंचायत निवडणुकीसाठी आयोजित प्रचार सभेत भाषण करताना आपल्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनींच्या गालासारखे केल्याचं म्हटलं आहे. इतकंच नाही तर हेमा मालिनीच्या गालासारखे रस्ते दिसले नाहीत तर राजीनामा देईन असंही त्यांनी म्हटलं आहे. तोंडसुख घेणाऱ्या गुलाबराव पाटलांच्या मतदारसंघातील अस्वच्छ रस्ते पाहाच..